ED esakal
पुणे

Pune ED Crime : ‘ईडी’कडून अऱ्हाना बंधूंची ४७ कोटींची मालमत्ता जप्त

रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली.

सकाळ वृत्तसेवा

रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली.

पुणे - कॅम्पमधील रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी जप्त केली. त्यात रोझरी स्कूलची इमारत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.

विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे घेऊन ही रक्कम नूतनीकरणासाठी न वापरता अपहार केला, अशी फिर्याद बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली होती. त्यावरून रोझरी स्कूलचे संचालक विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून करण्यात येत होता.

दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी केली. त्यानंतर ‘ईडी’ने १० मार्च रोजी विनय अऱ्हाना यांना अटक केली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांची २० मार्चपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत रवानगी केली आहे. विनय अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख रुपये इतके आहे, अशी माहिती ‘ईडी’ने जारी केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT