nurse sakal
पुणे

पुणे : आरोग्यसेवकांच्या चारशे जागांसाठी २५ हजार इच्छुक

झेडपीतर्फे येत्या आक्टोबरमध्ये लेखी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पुरुष व महिला आरोग्यसेवकांच्या सुमारे ४०० रिक्त जागांसाठी तब्बल २५ हजार युवक-युवतींनी अर्ज केले आहेत. यामुळे इच्छुकांमधून आता लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे पात्र आरोग्यसेवकांची निवड करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. यानुसार या रिक्त जागा भरण्यासाठी येत्या आक्टोबर महिन्यात लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या युवक-युवतींना दिलासा मिळाला आहे. ही सर्व पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. त्यानुसार ही पदे भरण्यासाठी राज्य सरकारने आणि जिल्हा परिषदेने २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच या भरतीला सरकारने स्थगिती दिली होती. ती स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी ही पदे भरली जाणार आहेत.

या परीक्षेसाठी माध्यमिक शाळांची निवड करावी. ही निवड करण्यासाठी आणि परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाची मदत घ्यावी. शिवाय शाळा निवडीसाठी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी द्याव्यात, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना दिला आहे.

जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५३९ आरोग्य उपकेंद्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रात मिळून सहायक परिचारिकांच्या (ए.एन.एम.) २५० आणि पुरुष आरोग्य सेवकांची (एम.पी. डब्ल्यू.) १५० जागा रिक्त आहेत.

या रिक्त पदांसाठी इच्छुकांकडून २०१९ मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. परंतु त्यानंतर या पद भरतील सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे त्यावेळी ही भरती होऊ शकली नव्हती. आता ही स्थगिती उठविली आहे. रिक्त जागांच्या तुलनेत मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार निवड केली जाणार आहे.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT