police 
पुणे

पुण्यात ट्रॅफिक पोलिस निरीक्षकास काठीने मारहाण; चौघाना ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रस्त्याने जाताना आरडा-ओरडा करु नका, तुमच्या गोंधळात एखादा खाली पडून जखमी होईल, असे सांगितल्याचा राग आल्याने टोळक्याने वाहतूक शाखेतील एका सहायक पोलिस निरीक्षकाला काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (ता.१) रात्री पावणेआठच्या सुमारास वानवडी परिसरात घडली.

किशोर लक्ष्मण खंडाळे (वय १८, रा. फातिमानगर), सनी रणजित टाक (वय २४), शैलेश रविकांत पुणेकर (वय २२,  रा.मार्केट यार्ड), आकाश शशिकांत जाधव (वय २६, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस निरीक्षक गोविंद जाधव वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ३१ जानेवारीला ते वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांवर कारवाई करीत होते. त्यावेळी तेथून दुचाकीवर जाणारे टोळके हातातील काठ्या रस्त्यावर घासून आरडा-ओरडा करीत चालले होते.

त्यावेळी फिर्यादींनी संबंधित दुचाकीस्वारांना अडवून शांतपणे जाण्याचा सल्ला दिला. रस्त्यावर काठ्या घासून गोंधळात कोणीतरी खाली पडल्यास जखमी होईल, असे त्यांनी पुन्हा सांगितले. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने त्यांना काठीने मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे तपास करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT