Pune Autorikshaw Straike esakal
पुणे

Pune Autorikshaw Strike: रिक्षा आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर, दंगल नियंत्रक पथक दाखल

सकाळ डिजिटल टीम

Pune autorickshaw drivers strike: पुण्यातील रिक्षाचालकांनी आज पुन्हा एकदा बंदची हाक दिली. त्यामुळे पुणेकरांचे आज भलते हाल झाले. काही दिवसांपूर्वी देखील पुण्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक धोरण अवलंबून काही करुन सरकारनं आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून एल्गार पुकारला होता.

बाईक टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीच्या विरोधात सकाळी ११ वाजल्यापासून रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन केलं. संचेती हॉस्पिटलपासून पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता देखील बंद होता. जुना बाजार चौकतून आरटीओ कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि जहांगीर हॉस्पिटल चौकापासून संचेती हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता बंद झाल्यानं मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने स्पेशल पोलिस फोर्स बोलावलं आहे. यामध्ये दंगल नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आलेलं आहे. पोलिस आंदोलकांना वारंवार समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान, आज दुपारी रिक्षा चालक रिक्षा रस्त्यावर सोडून घरी निघून गेल्याने आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रिक्षाचालक हे अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. सध्या स्वतः पोलिस रस्त्यावरील रिक्षा बाजूला नेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT