Pune nude Photographs Exhibition
Pune nude Photographs Exhibition google
पुणे

पुण्यात न्यूड फोटो प्रदर्शनावरून वाद, 'बालगंधर्व'नं घातली बंदी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात (Balgandharva Art Gallery) न्यूड फोटोचे (Nude Photo Exhibition) प्रदर्शन भरविण्यात आले होते. न्यूड फोटो असल्यामुळे व्यवस्थापनाने तातडीने प्रदर्शन बंद केले आहे. काही नागरिकांनी देखील या प्रदर्शनावर आक्षेप घेतला होता. पण, कोणाच्यातरी दबावाखील येत व्यवस्थापनाने प्रदर्शन बंद केल्याचा आरोप छायाचित्रकार अक्षय माळी याने केला आहे.

अक्षय माळी या छायाचित्रकाराने शुक्रवारी हे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाची थीम 'IT'S ME' होती. न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्यानंतर ते 8 आणि 9 असे तीन दिवस सुरू राहणार होते. पण पहिल्याच दिवशी एका फोन आल्याने बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा प्रदर्शन बंद केले. ''मी जेव्हा स्लॉट बुक केला तेव्हा मी मॅनेजमेंटला न्यूड थीमबद्दल सांगितले नव्हते. मी फक्त फोटोग्राफीचे प्रदर्शन असेल असे नमूद करून स्लॉट बुक केला होता. या प्रदर्शनात निसर्गात क्लिक केलेले माझे आणि इतर मॉडेल्सचे नग्न फोटो आहेत. यापूर्वी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी प्रदर्शन फोटो टाकले होते. गॅलरीत मी माझे फोटो दाखवण्याची ही पहिलीच वेळ होती. पण माझ्या कलाकृतीला अशा प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कलेला कोणतेही नियम किंवा सीमा नसतात, परंतु एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,'' असा आरोप माळी याने केला.

थीम आधी सांगितली नव्हती -

छायाचित्रकार अक्षय माळी यांनी प्रदर्शनाची थीम व्यवस्थापनाला आधीच सांगायला हवी होती. आम्ही अशा कोणत्याही प्रदर्शनांना परवानगी देत ​​नाही, ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील. आर्ट गॅलरीत न्यूड फोटो योग्य वाटत नाही. आम्हाला थीम समजल्यानंतर छायाचित्रकाराला फोटो हटविण्यास सांगितले, असं बालगंधर्व कलादालनाचे प्रभारी सुनील माटे यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT