husband_wife_ 
पुणे

पत्नीला पिस्तूल दाखवणे पतीच्या अंगलट; 2 पिस्तूलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- भीती दाखविण्यासाठी पत्नीला पिस्तूल दाखवणे पतीच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्यातील वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेल्यावर दोन गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या पतीसह बारामतीमधील एका सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली.बाळासाहेब उमाजी मदने (रा. चौधरी वस्ती) व सुग्रीव अंकुश भंडलकर (रा.बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुग्रीव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. 

आसगावकर गुरूजीच शिक्षकांचे आमदार; पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलिस ठाण्यात एका महिलेने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली होती. पतीकडे काडतुसे असल्याने आपल्या जिवाला भीती असल्याची माहिती तिने त्यावेळी पोलिसांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पतीला चौकशीसाठी बोलावून घेतले. तो कारमधून पोलिस ठाण्यात आल्यावर त्याच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये चार काडतुसे आढळून आली. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने घरी गावठी पिस्तूल असल्याचे सांगितले. त्याच्या घराच्या झडतीत एक गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. यानंतर मदनेला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली. 

चौकशीदरम्यान त्याने पिस्तूल व काडतुसे सुग्रीवकडुन 40 हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी बारामती तालुक्‍यातील खोडस येथे जाऊन सुग्रीवला ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत एक गावठी पिस्तूल व चार काडतुसे सापडली. त्याचे रेकॉर्ड तपासले असता, तो ग्रामीण भागातील सराईत गुंड असल्याचे निष्पन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT