बारामतीची लेक बनली आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ sakal
पुणे

पुणे : बारामतीची लेक बनली आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ

डॉ.अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांची निवड ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेनच्या इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA) या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : मुलींच्या शिक्षणाची सुविधा ग्रामीण भागात निर्माण झाल्यानंतर या सावित्रीच्या लेकी किती गगनभरारी घेतात याचा प्रत्यय बारामतीत आला आहे. बारामतीच्या डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांची निवड ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेनच्या इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA) या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे. प्लँट म्युटेशन ब्रिडींगवर तेथे त्या संशोधन करणार आहेत.

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरमध्ये माध्यमिक व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुण्यात त्यांनी बी.एस्सी. हॉर्टिकल्चर केले. जिनॅटिक्स व प्लँट ब्रिडींग या विषयात त्यांनी एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. राहुरी कृषी विद्यापीठात त्यांनी कपाशी या पिकावर पीएच.डी. प्राप्त केली.

पुण्यात एक वर्षाची नोकरी केल्यानंतर हैदराबाद येथे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अँरिड ट्रॉपिक (ICRASAC) यामध्ये तूर पैदासकार शास्त्रज्ञ म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. गेल्या चार वर्षांपासून एशिया प्रोग्राम लीडर म्हणून त्यांनी या विषयात काम केले आहे. जगामधील कडधान्यातील पहिले हायब्रिड वाण विकसीत करण्यामध्ये डॉ. अनुपमा हिंगणे यांचा सिंहाचा वाटा आहे. या शिवाय सर्वात लवकर येणारे (सुपर अर्ली व्हरायटी) तूरीचे वाण जागतिक स्तरावर विकसित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

गेल्या सात वर्षांमध्ये जगातील तब्बल 19 देशांना तूरीच्या 118 वेगवेगळ्या व्हरायटीज देण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. अशा प्रकारे काम करणा-या त्या एकमेव भारतीय महिला आहेत.

व्हिएन्ना येथेही त्या संशोधनाचेच काम करणार असून मानवजातीच्या उपयुक्ततेसाठी प्रामुख्याने त्यांच्या संशोधनाचे काम चालणार आहे. भारतामध्ये काम करताना त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, ओरिसा, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यात संशोधनाचे मोठे काम केलेले आहे.

चौकट- कुटुंबियांकडून मिळाले बाळकडू...

ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील या मुलीला आजोबा आत्माराम हिंगणे, वडील जगन्नाथ हिंगणे, काका विष्णूपंत हिंगणे यांच्याकडून हे बाळकडू मिळालेले आहे. आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर या मुलीने जग पादाक्रांत केले असून एक शास्त्रज्ञ म्हणून आज ही बारामतीची लेक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT