Pune Sakal
पुणे

Pune : अर्थिक फसवणूकीमधील ऊसतोड मुकादामांच्या बारामतीचे पोलिस मुसक्या आवळणार

त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरच्या तुलनेत आता पुणे जिल्ह्यातही माळेगावच्या प्रशासनाने मुकादमांविरुद्ध कारवाईची मोहिम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले.

कल्याण पाचंगणे

माळेगाव - गतवर्षी कराराप्रमाणे सुमारे चार कोटी रुपये अॅडव्हास रक्कम घेवूनही अनेक ऊस तोडणीला मुकादम व त्यांचे मजूर माळेगाव कारखाना कार्यस्थळावर आले नाही.  त्यामुळे संबंधित मुकादमांविरुद्ध अर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी माळेगाव कारखान्याच्या निलकंठेश्वर ऊस वाहतूकदार संघटनेने आज आक्रमक भूमिका घेतली व  पोलिसांकडे कडक कारवाईची आज मागणी केली.

याशिवाय फसवणूक झालेल्या ५० पेक्षा अधिक ट्रक, टॅक्टर ऊस वाहतूकदारांनी बीड, धुळे जळगाव आदी ठिकाणच्या मुकादमांविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या. विशेषतः या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांकडून ठोस कारवाई होण्यासाठी खुद्द संचालक योगेश जगताप, नितीन सातव,  स्वप्नील जगताप आदी पदाधिकारी माळेगाव पोलिस ठाण्यात बसून होते.

त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरच्या तुलनेत आता पुणे जिल्ह्यातही माळेगावच्या प्रशासनाने मुकादमांविरुद्ध कारवाईची मोहिम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, माळेगावसह सर्वच साखर कारखान्यावर आगामी ऊस गळीत हंगामाच्या (सन २०२३-२४) पार्श्वभूमिवर ऊस तोडणी मुकादम व मजूरांचे करार करण्याचे काम सुरू आहेत. अर्थात या करार प्रक्रियेत कोठ्यावधी रुपये अॅडव्हास स्वरूपात संबंधित तोडणी यंत्रणेला दिले जात आहेत.

गतवर्षीही अशापद्धतीचे करार झाले होते. परंतु  कराराप्रमाणे अनेक मुकादम व मजूर ऊस तोडणीसाठी कारखाना कार्यस्थळावर फिरकले नाहीत. परिणामी कारखान्याचे पर्य़ायाने ऊस वाहतूकदार ठेकेदारांची मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक झाली. माळेगाव कारखान्याच्या निलकंठेश्वर ट्रक, टॅक्टर ऊस वाहतूकदारांचे सुमारे चार कोटी रुपये अनेक मुकादमांकडे गुंतून पडले आहेत. ते ऊस वाहतूकदार पुर्णतः कर्जबाजारी झाले आहेत.

त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही वाहतूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी माळेगावच्या प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. ऐवढ्यावर न थांबता प्रशासनाने गतवर्षी  फसवणूक केलेल्या मुकादमांविरुद्धही पोलिसांकडून कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत निलकंठेश्वर ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे,उपाध्यक्ष श्रीपाद तावरे म्हणाले,`` ऊस तोड मुकादमांनी कोठ्यावधी रुपयांना गंठा घालून ऊस वाहतूकदारांना कर्ज बाजारी केले.

त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई होण्यासाठी बीड, चाळीसगाव, करमाळा, जामखेड, धुळे जळगाव, कन्नड आदी भागात गेलो, परंतु तेथे उलटपक्षी आमच्यावरच कारवाईची वेळ आली. आमची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली.

परंतु माळेगावचे संचालक नितीन सातव, योगेश जगताप, स्वप्निल जगताप आदी संचालक मंडळाने आम्हाला चांगला आधार दिला. पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी संबंधित मुकादमांकडून वसूलपात्र रक्कम मिळवून देण्याचा प्रय़त्न केला. ही गोष्ट आमच्यासाठी खूप समाधानाची आहे.``

सरकारकडे दाद मागणार...

माळेगावसह सर्वच साखर कारखान्यावरील ऊस वाहतूकदारांची अर्थिक फसवणूक  झाली आहे. त्यामुळे संबंधित मुकादमांविरुद्ध पोलिस कारवाई करणे, वसूल पात्र रक्कम पुन्हा मिळविणे आदी गोष्टींसाठी सरकारकडे पर्य़ायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.

हा प्रश्न राज्यस्तरिय प्रश्न आहे, त्यामुळे अजितदादा नक्की हा प्रश्न सोडविण्यास मदत करतील. याशिवाय माळेगाव कारखानाही या प्रक्रियेत पोलिसांबरोबर सर्वतोपरी मदत करेल, अशी माहिती संचालक योगेश जगताप, नितीन सातव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसामुळे भलेमोठे झाड १० ते १२ रिक्षांवर कोसळले, तर कुर्ल्यात वीज पुरवठा खंडित, रहिवाशांचे हाल

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

New Luggage Rules : विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही लागू होणार 'लगेज नियम', अतिरिक्त साहित्य घेऊन जाणं पडणार महागात...नेमका निर्णय काय?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुणे ते मुंबई जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द!

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT