Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : मैत्रिणीला धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाणीत मृत्यू , दोघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

घटनेची सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरून त्यांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - मैत्रिणीस धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करीत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

टिपू सुलतान मन्सूरी (वय २४ रा. घोरपडी) व अनिरुद्ध राठोड (वय २५ रा. वडगाव शेरी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. मन्सूरी आणि राठोड यांनी केलेल्या मारहाणीत चंदन प्रकाश जयप्रकाश सिंग (वय ३६, रा.विश्रांतवाडी) यांचा मृत्यू झाला होता.

चंदन हे मैत्रिणीसोबत २४ फेब्रुवारी २०१९ ला खराडीमधील हॉटेल एम्पायर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. मन्सूरी व राठोड हे देखील त्याच हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. चंदन यांच्या मैत्रिणीस आरोपींचा धक्का लागला.

या कारणावरून चंदन व दोन्ही आरोपी यांच्यात हॉटेलमध्ये भांडणे झाली. रात्री दीडच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर मन्सूरी व राठोड यांनी चंदन यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. हा मारहाणीचा सर्व

प्रकार हॉटेल बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता. चंदन हे घरी गेल्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद चंदन यांचे बंधू राहुल जयप्रकाश सिंग यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात दिली होती.

त्यावरून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी १२ साक्षीदारांची साक्ष घेतली.

घटनेची सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरून त्यांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी पाच लाख रुपये चंदन यांच्या पत्नीस देण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: वडिलांनंतर आईही गेली, पण अनिमेश हरला नाही; कोचिंगशिवाय UPSCत देशात दुसरा, यशाच्या क्षणी आई-वडील नसल्यामूळे भावूक

Miraj News: आपत्कालीन दरवाजातून उड्या; आठ विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी,चालक-वाहकाची सतर्कता; एसटी थेट पोलिस ठाण्यात नेल्याने प्रकार थांबला

Kolhapur Politics: गोकुळ’साठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली; महायुती म्हणून लढणार, निवडणूक कार्यक्रमाच्या तारखेकडे लक्ष

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Mumbai DahiHandi: मुंबईत ७ वर्षीय चिमुकल्यासह ३४ वर्षांच्या तरुणाचा दहीहंडीवेळी मृत्यू; २३६ गोविंदा जखमी

SCROLL FOR NEXT