PMPL Bus Sakal
पुणे

बीआरटी मार्गात पीएमपीएलच्या बसची नेहमीच शर्यत

पीएमपीएल बसच्या चालकांनी सर्व नियमांना फाटा देत आपल्या मर्जीप्रमाणे बस चालवून सुसंस्कृत पुण्याचे दर्शन घडविण्याचे काम दररोज करत आहेत.

नितीन बिबवे

बिबवेवाडी - कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग सुरू होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने करून व महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने प्रयत्न करून काही महिन्यांपूर्वी कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग सुरु केला, सुरवातीच्या काळात बीआरटी मार्गातील प्रत्येक चौकात, बस थांब्यावर पीएमपीएल चे कर्मचारी उपस्थित राहून मार्गातील वाहतूक व्यवस्था पहात होते. त्यामुळे बीआरटी मार्गातील वाहतूक सुरळीत चालू होती. परंतु. पीएमपीएल बसच्या चालकांनी सर्व नियमांना फाटा देत आपल्या मर्जीप्रमाणे बस चालवून सुसंस्कृत पुण्याचे दर्शन घडविण्याचे काम दररोज करत आहेत. त्यासाठी त्यांच्यात शर्यत लागल्याचे चित्र सातारा रस्त्यावर नेहमी पाहायला मिळत असून वाहतूक पोलीस आपली कार्यक्षमता दाखवून देत आहे.

कात्रज ते स्वारगेट दरम्यान पीएमपीएल चे अकरा बस थांवे असून आठ चौक आहेत, अनेकवेळा सिग्नलला चौकातून पुढे जाण्याच्या प्रयत्नात अपघात झाले असून नागरीक गंभीर जखमी झाले आहेत.

वाहतूक सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबल्यास वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात मग वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीएल बसवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.

शफील पठाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर वाहतूक विभाग) - नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असून, बीआरटी मार्गात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

अभिजित टेंबेकर (नागरीक) - बीआरटी मार्गात अनेकवेळा अपघात झाले आहेत, पीएमपीएल बस चे चालक अनेक वेळा नियम धाब्यावर बसवून बस चालवतात त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT