Pune accident 
पुणे

Pune : ब्रेक फेल झाल्याने बसची सहा वाहनांना धडक; भीषण अपघातात एकजण ठार, तर...

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २१ : भरधाव ट्रॅव्हल्स बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना उंड्री परिसरातील एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री सव्वासात वाजता घडली.

या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा (क्रमांक एमएच १२- एचबी ०२४२) ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली. बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींवर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात तीन मोटारींसह टेम्पो, रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. मोहसीन शेख (रा. जुना मोदीखाना, कॅम्प), निखिल बक्षी (रा. न्याती ऑपिटल सोसायटी) आणि राजेश जेडीपाल (रा. रहेजा विस्टा सोसायटी) यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. जेडीपाल हेही किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: उदगीरमध्ये भरदिवसा दोन घरांवर डल्ला; सहा लाखांचा ऐवज लंपास

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT