मिलिंद एकबोटे आणि स्वप्नील नाईक sakal
पुणे

पुणे : मिलिंद एकबोटे आणि स्वप्नील नाईक यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीरपणे जमाव जमवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे: बेकायदेशीरपणे जमाव जमवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीसमस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे.या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे तक्रार देण्यात आली आहे. मिलिंद एकबोटे यांना अटक केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहरात मंगळवारी (ता.1) महाशिवरात्री उत्साहात पार पडली. अनेक भागात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान कसबा पेठमधील पवळे चौकात देखील पूजेचा कार्यक्रम देखील पार पडला. पुण्यश्वर बचाव समिती व इतर संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याला मिलिंद एकबोटे, स्वप्नील नाईक व इतर उपस्थित होते. पंरतु या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती. बेकायदेशीर जमाव जमवून तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT