Triple Talaq sakal
पुणे

Triple Talaq : ट्रिपल तलाकप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने पतीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, त्याला जामीन दिला आहे. दरम्यान, सासू, सासरा, नणंद आणि नंदावा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

या संदर्भात २३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेवर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीने तीन वेळेस तलाक म्हणत नांदवण्यास नकार दिला. तसेच, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास नणंदेच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून खडकी पोलिसांनी पती अकीब आयुब मुल्ला (वय ३१, रा. नवीन नाना पेठ, पद्मजी पार्क, पुणे) याला अटक केली.

पतीसह सासू, सासरा, नणंद आणि नंदावा यांच्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध ९ मे रोजी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी २३ मे रोजी पतीला ट्रिपल तलाकच्या गुन्ह्यात अटक केली. ट्रिपल तलाकप्रकरणी पतीला अटक झाल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२२ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT