अपघात sakal
पुणे

Pune accident news : पुण्यात मिनी बसचा स्टेअरिंग रोड तुटल्याने अपघात सुदैवाने नऊ जण बचावले

सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. यातील फक्त एका व्यक्तीच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : चांदणी चौक आणि वेड भवन खिंड यांच्या मध्ये मिनीबसचा स्टेरिंग रोड तुटल्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूणनऊ जण नऊ व्यक्ती होत्या. सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. यातील फक्त एका व्यक्तीच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

या रस्त्याने जाणाऱ्या एक कार चालकाने हा अपघात पाहून अपघातग्रस्तांना मदत होण्याच्या दृष्टीने ही माहिती सकाळच्या प्रतिनिधीला दिली. पोलिसांना अन्य यंत्रणांना माहिती द्यावी. अशी त्यांनी विनंती केली. वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर व वारजे वाहतूक विभागाचे हवालदार राकेश कांबळे यांना याची माहिती दिली.

मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर ही घटना झाली. सकाळची वेळ असल्याने मुंबई व हिंजवडीला जाणाऱ्यांची वाहन संख्या मोठी असते. परिणामी लगेच वाहनांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली होती.

मिनी बस स्टेरिंग रोड चुकल्यामुळे चालकाचे बस मिनी बसवरील नियंत्रण सुटले आणि मिनीबस रस्त्यावर आडवी पडली आहे. परिणामी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. वारजे वाहतूक विभागाचे कर्मचारी पोचले आहेत. वाहतूक सुरळीत करीत आहे.

वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांची माहिती घेतली त्यावेळी बसमध्ये एकूण नऊ जण होते यातील एका व्यक्तीच्या हाताला जखम झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT