Pune Chandni Chowk Accident 
पुणे

Pune Chandni Chowk Accident: चांदणी चौकातील दुभाजक रंगवणाऱ्या दोन कामगारांना कारने उडविले; पुलावरुन पडून जागीच मृत्यू

Pune Chandni Chowk Accident: कामगार काम करत असलेल्या ठिकाण पासून सुमारे १५ - २० मीटर लांब बॅरिकेट लावले असूनही कारने पुलाच्या कठड्यांना डाव्या बाजूने घासत या कामगारांना उडवले.

सकाळ वृत्तसेवा

Pune Chandni Chowk Accident:

वारजे: मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर डुक्कर खिंडच्या पुढे असणाऱ्या उड्डाणपुलावर चांदणी चौकाच्या दिशेने जात असलेल्या भरधाव मोटारीने दुभाजकाला रंगरंगोटी करत असलेल्या दोन कामगारांना उडविले. हे दोन्ही कामगार उडून पुलाच्या खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना वारजे येथे घडली.  यात कारमध्ये असलेले चौघे देखील जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी गौड  (वय २३ रा. सिद्धार्थ नगर युपी ) व विजय बहादुर मटरू चौहान (वय २८ रा. वाराणसी दोघेही सध्या रा .चिखली)  अशी मयतांची नावे आहेत. या प्रकरणी कारचालक बाळू महादेव शिंदे (वय ३४ रा. चिखली) याच्या विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास  देशमुख कुटुंबीय नऱ्हे भागातून आपल्या घरी चिखली येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची अल्टो कार डुक्कर खिंडीपासून पुढे असलेल्या उड्डाण पुलावर आली असताना भरधाव असलेली मोटारने रस्त्याच्या कडेला दुभाजकाला  रंगकाम करत असलेल्या दोन कामगारांना धडक दिली. (Latest Marathi News)

कामगार काम करत असलेल्या ठिकाण पासून सुमारे १५ - २० मीटर लांब बॅरिकेट लावले असूनही कारने पुलाच्या कठड्यांना डाव्या बाजूने घासत या कामगारांना उडवले. हे दोघे कारच्या बोनटवरून उडून पुलाच्या कठड्यावरून सुमारे ४० फूट खाली फेकले गेले. या दोघांना डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, असावा अशी माहिती प्रत्यक्ष दर्शीनीने दिली. (Latest Pune News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT