Mask-Corona
Mask-Corona 
पुणे

Coronavirus : अव्वाच्या सव्वा किंमतीने मास्क विकणाऱ्यांवर लक्ष्य कोण ठेवणार?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील 'एमआरपी'पेक्षा दुपटीपेक्षा दराने सर्व प्रकारच्या मास्कची सर्रास विक्री होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकांना 'अन्न व औषध प्रशासन'मधील (एफडीए) अधिकारी उपस्थित राहावे लागत असल्याने वाट्टेल त्या भावाने मास्क विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार तरी कोण, असा प्रश्‍न पडला आहे.

कात्रज, गोकुळनगर अशा उपनगरांमधील काही भागात एकेका मास्कची 900 रुपयांना विक्री होत असल्याची गंधवार्ता 'एफडीए'ला नाही. माध्यमातून या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपल्या कामाच्या हद्दीवरून टोलवा-टोलवी सुरू होते. त्यामुळे खरेदी किंमतीपेक्षा कित्येक पटींनी जास्त दरात विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्‍न या वादात अनुत्तरीतच राहात असल्याचे गुरुवारी स्पष्ट दिसले. 

मास्कची अव्वाच्या सव्वा दराचे विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी थेट 'एफडीए'च्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवर मास्कची विक्री करण्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण, 'एफडीए'चे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यस्त असतात! 
'एन 95' प्रकारच्या मास्कची खरेदी किंमत 140 आणि त्यावर वस्तू व सेवा कर असे मिळून 147 रुपयांच्या दरम्यान खरेदी किंमत आहे. प्रत्यक्षात याची विक्री तीनशेपेक्षा जास्त रुपयांना होत असल्याचे दिसते. यावर नियंत्रण कधी आणि कोणती सरकारी यंत्रणा आणणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष आहे. 

'' प्रत्येक मास्कची खरेदी-विक्री बिलावर करावी. त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असा प्रयत्न न करण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत. ही सामाजिक सामाजिक बांधिलकी जपण्याची वेळ आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायजर योग्य किंमतीत विक्री करण्याचे आवाहनदेखील केले आहे,'' 
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT