Corona Patient Sakal
पुणे

पुणेकरांसाठी दिलासा; कोरोना रुग्ण संख्या वेगाने होतेय कमी

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. पुणेकरांसाठी मोठी दिलासा देणारी ही घटना ठरु लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. पुणेकरांसाठी मोठी दिलासा देणारी ही घटना ठरु लागली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. पुणेकरांसाठी मोठी दिलासा देणारी ही घटना ठरु लागली आहे. गेल्या सात दिवसांत ३० हजार २३३ सक्रिय कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. यानुसार दिवसाला सरासरी ४ हजार ३१९ सक्रिय रुग्ण कमी होत असल्याचे उघडकीस आले आहे.

सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात ६३ हजार ४०९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामध्ये रविवारी (ता.३०) दिवसभरात आढळून आलेल्या ७ हजार ६१७ नवीन रुग्णांचा समावेश आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील पाच आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन कोरोना मृत्यू आहेत. दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार ८९६ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार १३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १५५, नगरपालिका हद्दीत २८६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४७ नवे रुग्ण सापडले आहेत.

याऊलट जिल्ह्यात १३ हजार ७०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६ हजार २८३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४ हजार ३६९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ३०५, नगरपालिका हद्दीतील ५१६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT