Pune Crowd Sakal
पुणे

अबब! पुण्यात खरेदीसाठी उसळली गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात व्यवहारांवर महापालिकेकडून निर्बंध आणण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली दुकाने... (Shops) खरेदीसाठी (Purchasing) उसळलेली गर्दी, (Crowd) त्यातच महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांची कामे (Road Work) आणि त्यामुळे जागोजागी झालेली वाहतूक कोंडी (Traffic) असे चित्र मंगळवारी शहरात सर्वत्र पहावयास मिळाले. दिवस जसा उगवला अन्‌ घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, तशी गर्दी वाढतच होती. दोन वाजले अन्‌ हळूहळू पुन्हा रस्ते रिकामे होऊ लागले. (Pune Citizens Crowd Purchasing Shopping Mob after Lockdown)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात व्यवहारांवर महापालिकेकडून निर्बंध आणण्यात आले होते. सकाळी सात ते अकरा या वेळेत ठरावीक दुकानांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शहरात थोडीफार वर्दळ होती. परंतु मंगळवारपासून शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास महापालिकेने परवानगी दिली आणि गेल्या दोन महिन्यांपासून घरात कोंडलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी शहरातील सर्वच नागरिक रस्त्यावर उतरली. त्यामुळे सकाळापासून रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊ लागली. एरवी सकाळी दहानंतर उघडणारी दुकाने आज सकाळी सात साडेसातच्या सुमारास खुली झाली होती.

दहानंतर तर शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती.जणू या शहरात कोरोनाचा नावाची महामारी कधी आलीच नव्हती, असे चित्र होते. भवानी पेठेतील बाजाराचा परिसर, रविवार पेठेतील बोहरी आळी आणि परिसर, तुळशीबाग, मंडईसह, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, हडपसर अशा सर्वच भागात खरेदीसाठी गर्दी उसळली होती. शहराबरोबरच उपनगरातही हेच चित्र होते. महापालिकेकडून शहराच्या अनेक भागात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे अद्याप अर्धवट आहेत. त्याचा फटका वाहतुकीला बसला. त्यातून शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची कोंडी झाली होती.दुपारी दोनपर्यंत शहरातील सर्वच भागात हे चित्र होते. दोन नंतर मात्र दुकाने बंद होऊ लागली. तशी रस्त्यावरील वर्दळ कमी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT