डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.14) शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary) गुरुवारी (ता.14) शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतुकीमध्ये बदल (Transport Changes) करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे स्टेशन, लष्कर परिसर, विश्रांतवाडी, सावरकर चौक, दांडेकर पुल, दत्तवाडी परिसरात वाहतकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लष्कर परिसरातील हॉटेल अरोरा टॉवर्स येथील डॉ.आंबेडकर पुतळा व विश्रांतवाडी येथे डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक येतात. त्यामुळे या परिसरात गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी वाहतुक शाखेकडून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
असा आहे वाहतुकीतील बदल
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर -
* शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक बंद, वाहनचालकांनी शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौक मार्गे, आरटीओ चौक, जहॉंगीर चौकातुन पुढे जाव.
* जीपीओ चौकाकडून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतुक बंद, जीपीओ चौकातुन बोल्हाई/मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक किराड चौक, नेहरु मेमोरीअल चौक मार्गे इच्छित स्थळी जावे
* पुणे स्टेशन चौकातुन मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक बंद,
* नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक बंद, वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक,कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभार वेस मार्गे पुढे जावे
* बॅनर्जी चौकातुन अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतुक बंद, बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभार वेस मार्गे पुढे जावे
लष्कर परिसर, हॉटेल अरोरा टॉवर्स
* कोयाजी रोडवरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतुक तीन तोफा चौक येथे बंद करुन ती एसबीआय हाऊस मार्गे वळविण्यात आली आहे
* ईस्कॉन मंदिर चौकाकडून अरोरा टॉवर्स येथील डॉ.आंबेडकर पुतळ्याकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे
* नेहरु चौकाकडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येत असून हि वाहतुक नेहरु चौकातुन डावीकडे किराड चौकाकडे वळविण्यात आली आहे.
विश्रांतवाडी परिसर
* पुणे विमानतळाकडून टिंगरेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेंटल कॉर्नर चौकातुन वळून कॉमर्स झोन चौकाकडून डावीकडे वळून विमानतळाकडे पुढे जातील
* पुण्याकडून बोपखेल, दिघी, आळंदी, भोसरीकडे जाणारी वाहने शांतीनगर चौकातुन वळून चव्हाण मासे मार्केट परिसरातुन पुढे जावे
* कळस,म्हस्केवस्ती, बोपखेल, दिघी, आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कच्च्या मार्गाने शांतीनगर परिसरातुन पुढे जावे
दांडेकरपुल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्य प्रदेशातील महु येथील जन्मठिकाणाचा देखावा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दत्तवाडी वाहतुक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, सावरकर चौक येथुन नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याकडे (सिंहगड रस्ता) जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच याच रस्त्यावरील आशा चौक येथुन सावरकर चौकाकडे जाणारी वाहतुकही बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - स्वारगेटहून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सावरकर चौक, सारसबाग चौक,सणस पुतळा, कल्पना हॉटेल चौक, ना.सी.फडके चौक, सेनादत्त पोलिस चौकी, बालशिवाजी चौक येथून पुढे जावे. तर सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाण्यासाठी आशा हॉटेल चौकातुन डावीकडे वळून बाल शिवाजी चौक, सेनादत्त पोलिस चौकी, ना.सी.फडके चौक, कल्पना चौक येथून पुढे जावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.