milk 
पुणे

पुण्यात दुधाचा तुटवडा होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता.  ३१ : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी वितरित करण्यासाठी सर्वच दूध संस्थांकडे दुधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शनिवारी नियमित दूध पुरवठा सुरळीत राहिल, असे विविध दूध संघांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र शनिवारी होणाऱ्या दूध दरवाढ आंदोलनामुळे दूध संकलनात अडथळे निर्माण झाले तर, रविवारी शहरात तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी भाजपप्रणीत महायुतीच्यावतीने राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या दिवशी दूध संकलनात अडथळे निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी होऊ शकतो, असेही यावेळी सांगण्यात आले.

साधारणतः शहरात दुसऱ्या दिवशी वितरित केले जाणारे दूध आदल्या दिवशीच संकलीत केले जाते आणि मध्यरात्रीपासूनच ते वितरित करण्यात येते. त्यामुळे आंदोलन सुरु होईपर्यंत वितरण पुर्ण झालेले असेल. परिणामी तुटवडा जाणण्याचा प्रश्न उद्भभवणार नाही. 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे १५ लाख लिटर पिशव्यांमधील दूध लागत असते. मात्र मागील तीन महिन्यांपासून दररोजच्या मागणीत ५ लाख लिटरने घट झालेली आहे. मिठाई दुकाने, हाॅटेल्स आणि चहा टपऱ्या आणि शाळा महाविद्यालये बंद असल्याने ही घट झालेली आहे.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आंदोलनाला पाठिंबा; नासधूस नको - देवेंद्र शहा 
राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना दूध दरवाढ मिळावी, या मागणीसाठी उद्या पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला गोवर्धन दूध प्रकल्पाही पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना जास्त दर मिळावा, अशीच इच्छा आहे. पण बाजारातील सध्याच्या स्थितीमुळे हे शक्य नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी शांतता मार्गाने आंदोलन करावे. दूधाची नासधूस करु नये, असे आवाहन गोवर्धन दूध प्रकल्पाचे चेअरमन देवेंद्र शहा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT