Police Sakal
पुणे

शहर पोलिस दलास कोरोनाचा विळखा; 480 पोलिसांना कोरोनाने ग्रासले

शहरातील कोरोना संसर्ग वाढत असतानाच त्याचा फटका पुणे पोलिसांनाही बसू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोना संसर्ग वाढत असतानाच त्याचा फटका पुणे पोलिसांनाही बसू लागला आहे. मास्क, नाकाबंदीसारखी कारवाई, बंदोबस्त अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहर पोलिस दलातील तब्बल 480 पोलिस कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यामध्ये 50 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश पोलिस घरीच उपचार घेत असून त्यांच्या तब्येतीमध्येही सुधारणा होत आहे. (Pune Police Corona Positive)

मागील दोन वर्षात एक हजार 935 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यामध्ये 19 पोलिसांचा मृत्यु झाला. डिसेंबर महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यानंतर विविध प्रकारचे सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिसांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते.

त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच पोलिस आयुक्तालय, पोलिस मुख्यालयासह विविध पोलिस ठाणे, विविध पथकांमधील पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधीत होऊ लागले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी सर्व पोलिसांची कोरोना चाचणी घेण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार तपासणीमध्ये काही पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत असल्याचे आढळले.

त्यांच्यावर उपचार सुरू झाले. आत्तापर्यंत 430 पोलिस कर्मचारी व 50 पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाने ग्रासले. पोलिसांकडून विविध प्रकारची कारवाई शहरामध्ये सुरू आहे. तरीही नागरीक बेफिकीरपणे मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे. पोलिस संबंधित नागरीकांच्या संपर्कात येत असल्याने पोलिसांनाही त्याचा फटका बसू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT