sakal
पुणे

पुणे शहर पोलिस ठरले राज्यातील 'सर्वोत्कृष्ट पोलिस दल'

राज्यातील सर्व जिल्हे व शहरांमधील पोलिस दलांच्या कार्यक्षमता वाढीसाठी राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पुरस्कार' या स्पर्धेत पुणे पोलिस दल राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे: राज्यातील सर्व जिल्हे व शहरांमधील पोलिस दलांच्या कार्यक्षमता वाढीसाठी राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने घेतलेल्या "सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पुरस्कार' या स्पर्धेत पुणे पोलिस दल राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट कार्यपद्धती, गुन्हेगारी प्रतिबंध, गुन्ह्यांचा त्वरीत तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहीत करण्यासाठीच्या योजना, अशा निकषांमध्ये पुणे पोलिस अव्वल ठरले.

राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने "उत्कृष्ट पोलिस घटक पुरस्कार' आयोजित केला होता. मागील एक वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन, ज्यांची भारतीय दंडविधान कलमान्वये गुन्हे 6 हजारांपेक्षा जास्त आहेत, अशा राज्यातील 40 घटकांची श्रेणी तयार करण्यात आली होती. त्यांच्या कामगिरीच्या मुल्यांकनासाठी पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.

पोलिस महासंचालक कार्यालयातील अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अध्यक्ष व इतर सदस्य म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस अधिक्षक जळगाव, पोलिस अधिक्षक कोल्हापुर परिक्षेत्र यांचा समितीत समावेश होता.

असे आहेत स्पर्धेचे मापदंड

खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या अशा शिर्षकाखाली वर्षभरामध्ये दाखल होणारे गंभीर गुन्हे, तपासावर प्रलंबित राहणाऱ्या गुन्ह्यांची संख्या, अवैध धंद्यांवरील प्रभावी कारवाई (पिटा कायदा,अंमली पदार्थ विरोधी कायदा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे), माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारे दाखल होणारे गुन्हे, गुन्हेगारांविरुद्ध प्रभावीपणे होणारी कारवाई (मोका, एमपीडीए, तडीपार) दिर्घकाळ फरारी आरोपींचा शोध, दुर्बल घटकांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची तत्काळ निर्गती, महिला,बालके अत्याचाराविरुद्ध तत्काळ कारवाई ,प्रशासकीय कामकाज जलदगतीने करणे, अपघात कमी करणे, जातीय व सामाजिक सलोखा टिकविणे, अशा विविध मुद्यांसाठी निवड समितीने मुल्यांकन केले.

त्यामध्ये 6 हजार जास्त गुन्हे असलेल्या पोलिस 24 घटकांमधून पुणे शहर पोलिसांची "सर्वोत्कृष्ट पोलिस घटक' म्हणून समितीने निवड केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व प्रादेशिक विभाग, पश्‍चिम प्रादेशिक विभाग व गुन्हे विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांनी केलेल्या कामामुळे पुणे पोलिसांना पुरस्कार प्राप्त झाला.

"चांगले काम करायचे असे ठरवून आम्ही काम केले नाही, प्रत्येकवेळी अधिक चांगले काम करण्यावर आमचा भर असतो. त्यादृष्टीने प्रयत्न केले. सगळे काम केल्यानंतर अधिक चांगले काम कसे करायचे, हे आम्हाला या पुरस्कारामुळे कळले. या पुढेही असेच चांगले काम करू'' -अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT