Ganpati Visarjan Sakal
पुणे

Anant Chaturdashi : पुण्यनगरी सज्ज; भाविकांनी अशी घ्यावी काळजी

कोरोना उद्रेकाचं विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. गेले दहा दिवस ‘मोरया... मोरया...’ असा गजर या नगरीत दुमदुमत होता.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना उद्रेकाचं विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. गेले दहा दिवस ‘मोरया... मोरया...’ असा गजर या नगरीत दुमदुमत होता.

पुणे - कोरोना उद्रेकाचं विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. गेले दहा दिवस ‘मोरया... मोरया...’ असा गजर या नगरीत दुमदुमत होता. या वैभवशाली उत्सवाची सांगता शुक्रवारी (ता. ९) होणार आहे. त्यासाठी गणपती मंडळांचे रथ सजले आहेत, ढोल-ताशांची जय्यत तयारी झाली आहे. त्याच वेळी आपल्या लाडक्या बाप्पाला हात जोडून सर्व गणेश भक्त एकच प्रार्थना करत आहेत... ‘पुढच्या वर्षी लवकर या!’

एकदन्त, वक्रतुंड, लंबोदर, विनायक, विघ्नहर्ता, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन अशा विविध नावांनी ओळखला जाणारा आपला आवडता बाप्पा म्हणजे गणपती. वाजत-गाजत-नाचत ३१ ऑगस्टला गणपती आले. अवघी पुण्यनगरी या आनंदात इतके दिवस रममाण झाली. लहान मुलांना देशभक्तीचे, आपल्या इतिहासातून प्रेरणा देणारे सजीव देखावे, पौराणिक कथा, पर्यावरण रक्षणाचा संदेश असे विविध विषय प्रभावीपणे विविध मंडळांनी लोकांपुढे मांडले. या जनजागराचा समारोप गणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे.

शहरातील लक्ष्मी रस्ता हा गणपती विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे. मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक उद्या सकाळी या मार्गावरून सुरू होईल. तसेच, रात्री शहरातील प्रमुख गणपतींच्या मिरवणुकाही याच मार्गावरून जाणार आहेत. त्याच वेळी कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या मार्गांवरून येणाऱ्या मिरवणुकाही टिळक चौकात एकत्र येतात. या विविध गणपती मंडळांच्या स्वागताची तयारी या चौकात पूर्ण झाली आहे.

स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष

गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील मिरवणूक मार्गांसह उपनगरांमधून निघणाऱ्या मिरवणूक मार्गांवर सार्वजनिक स्वच्छतेकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष दिले आहे. औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. विविध ठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेतली आहे. त्यासाठी जीवरक्षकांची फौज उभी केली आहे.

दोन वर्षांनंतर मिरवणूक

कोरोना उद्रेकामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणपती विसर्जन मिरवणूक झाली नव्हती. सर्व मंडळांनी आपल्या मंडपामधील हौदातच गणपती विसर्जन केले होते. या वर्षी मात्र, धूमधडाक्यात विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.

भाविकांनी अशी घ्यावी काळजी

  • महिलांनी दागिने घालून गर्दीतून फिरू नये

  • थंडी, ताप, सर्दी, अॅलर्जी असलेल्यांनी गर्दी टाळावी

  • संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवावे

  • एकाच ठिकाणी रेंगाळत राहू नये

  • चोरांपासून सावध राहावे

  • फीडर पोलजवळ उभे राहू नये

  • लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे

  • गर्दीत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिसमित्र आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा

  • व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहावे

  • चोऱ्या टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा

आपत्कालीन वैद्यकीय सेवा

१) आरोग्य विभागाकडून

  • डेक्कन जिमखाना (नटराज टॉकीजजवळ)

  • नूतन मराठी विद्यालय, लक्ष्मी रस्ता

२) पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाकडून

  • बेलबाग चौक

  • पुरम चौक, टिळक रस्ता

  • एस. पी. कॉलेज

  • अलका टॉकीज चौक, शनिवार वाडा

  • नारायण पेठ पोलिस चौकीजवळ

  • शनिदत्त मंदिरासमोर, दत्तवाडी

  • स्वीटहोम जवळ, कुमठेकर रस्ता

  • कात्रज डेअरीजवळ

३) मॉडर्न विकास मंडळाकडून

  • विजय टॉकीज चौक

  • दोन फिरत्या रुग्णवाहिका

पथकांतील वादकांसाठी

  • स्वतःजवळ लिंबू व प्यायच्या पाण्याची बाटली ठेवावी

  • खडीसाखर सोबत बाळगा, कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत

  • ढोल वाजविताना दुसऱ्याला लागणार नाही, याची काळजी घ्या

  • पावसाची शक्यता गृहीत धरून रेनकोट जवळ बाळगा

वाहतुकीसाठी बंद रस्ते

  • लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता

दूरध्वनी

  • पोलिस नियंत्रण कक्ष : १००/ १०२

  • अग्निशामक दल : १०१

  • पुणे महापालिका : २६४५१७०७

  • पिंपरी-चिंचवड महापालिका : २७४२३३३३

  • पुणे कँटोन्मेंट : २६४५२१५९

  • अग्निशामक दल : २६४५०४५३

  • खडकी कँटोन्मेंट : २५८१७५१०

  • अग्निशामक दल : २५८१९१५५

रुग्णालये

  • ससून २६१२८०००

  • कमला नेहरू २६०५३८४९

  • पूना २४३३९७०६ , २६१२२८८०

  • सह्याद्री २५४०३०००, ०२०६७२१५००

  • भारती २४३६५८४८

  • सरदार वल्लभभाई पटेल कँटोन्मेंट रुग्णालय २६४५०५३०

पार्किंग येथे करावे

  • नदीपात्रालगतचे रस्ते

  • गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस

  • काँग्रेस भवन ते महापालिकेपर्यंतचा रस्ता

  • हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ

आपत्कालीन वैद्यकीय मदत

  • डॉ. मिलिंद भोई - ९९७००७७७७३

  • डॉ. नितीन बोरा ९८२२९६६६१

  • सदाशिव कुंदेन ९९२१५७४४९९

  • डॉ. नंदकिशोर बोरसे ९४२२०३२६९६

  • डॉ. शंतनू जगदाळे ९०११९१६६०७

  • डॉ. कुणाल कामठे ९८९०६१६३६५

  • डॉ. संदीप बुटाला ९९२३३०३४४५

  • डॉ. प्रशांत बोऱ्हुडे ८००७७७२८८८

रुग्णवाहिकेची सोय

नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट व रोटरी क्लब पुणे साउथ यांच्या वतीने सदाशिव पेठ हौदाजवळ मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. आयसीयू युनिट, डॉक्टर्स व परिचारिकांची व्यवस्थाही आहे. पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था केली आहे.

संपर्क : अतुल अत्रे ९४२२०६६११५,

दत्ता पाषाणकर ९८२२०००५०३

मेट्रो मध्यरात्री १ वाजेपर्यंत

  • महामेट्रोची वनाज-गरवारे मार्गावरील मेट्रो शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत धावणार आहे. या मार्गावर मेट्रो दर ३० मिनिटांनी धावेल. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.

हवामान

  • आकाश दिवसभर ढगाळ

  • हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी

  • उकाड्यात वाढ होण्याची शक्यता

  • स्थानिक पातळीवर कमाल तापमान आणि आर्द्रतेतील वाढ झाल्यास पावसाची शक्यता

  • सरासरी किमान तापमान २२ आणि कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT