Corona
Corona sakal
पुणे

पुणेकरांनो काळजी घ्या, दिवसभरात 1,104 रुग्णांची नोंद

निनाद कुलकर्णी

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमिक्रॉनची रूग्णसंख्या झापाट्याने वाढ होत असून पुणे (Active Corona Cases In Pune) शहरात मंगळवारी 1104 कोरोना रूग्णांची भर पडली आबे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे शहरात दिवसभरात 151 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एक कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. (Pune Records 1104 Corona Cases )

सध्या शहरात 89 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून पुण्यात सध्या 3,790 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत 51,26, 89 जणांना कोरोनाची लागण झाली असून 9,119 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे मनपा हद्दीतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Corona Latest News In Marathi)

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची (Corona) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाढत्या ओमिक्रॉनच्या (Omiccron) रूग्णसंख्येमुळे (School Closed In Pune City ) पुणे शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे. (Pune City School Closed Till 30th Jan 2022)

पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना संसर्ग

पुण्यामध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Covid 19 Vaccination) घेतलेले 80 टक्के लोक करोनाबाधित आढळत आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी (Pune Mayor Murlidhar Mohol On Covid Cases ) दिली आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता करण्याचे कारण जरी नसले तरी, आधीच्या निर्बंधांची (Covid Restrictions In Pune ) अधिक सक्तीने अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यातील रूग्णसंख्या एका आठवड्यात चौपट झाल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT