Temperature esakal
पुणे

Pune Temperature : पुणे शहरात उन्हाचा चटका कायम राहणार

पुणे शहरात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून, सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदिविले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून, सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदिविले जात आहे.

पुणे - शहरात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून, सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदिविले जात आहे. सकाळी थंडी आणि दूपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना सध्या पुणेकर करत आहे. दिवसभरात तापमानात तब्बल २० अंशांच्या फरक पडत असल्यामुळे नागरिक हैरान झाले आहे.

आठवडाभरापासून शहरातील उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बुधवारी शहरातील सरासरी किमान तापमान ३५.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. लोहगावात उन्हाचा कडाका उर्वरीत शहरापेक्षा जास्त होता म्हणूनच तेथील सरासरी कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवार (ता.१) पर्यंत शहरात दूपारनंतर आकाश अंशतः ढगाळ असेल, तसेच उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

विदर्भात पावसाचा इशारा...

उत्तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरूवारी (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा असून, तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT