PMC 
पुणे

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशपातळीवरच्या स्वच्छतेच्या स्पर्धेत गेल्या वर्षी मागे पडलेल्या पुणे शहराने यंदा मात्र आघाडी घेतली असून, भारतात १५, तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे. सार्वजनिक ठिकाणी राखलेल्या स्वच्छतेला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. विशेषत: कचरामुक्त (कंटेनरमुक्त) या घटकातही चांगली कामगिरी असल्याचे स्पर्धेच्या निकालातील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. गंभीर म्हणजे, स्वच्छ मोहिमेत पुणेकरांचा सहभागी कमी पडल्याचा ठपका महापालिकेवर ठेवला गेला आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानातर्गंत होणाऱ्या स्पर्धेत बहुतांशी राज्यातील शहरांचा समावेश होता. स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे २०१४ पासून यंदाही इंदूर आघाडी घेत पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर नवी मुंबई शहराला दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला आहे. पुण्यासोबतच ठाणे आणि नाशिकचा पहिल्या पंधरा शहरांच्या यादीत समावेश आहे. 

या स्पर्धेसाठी महापालिकेने जोरदार तयारी करीत संपूर्ण शहर आणि उपनगरे चकाचक ठेवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात रस्त्यावरील कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणण्यापासून सावर्जनिक आणि वैयक्तिक पातळीवरचे स्वच्छतागृहे नीटनेटकी करण्यात आली होती. त्यानंतर या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग वाढविण्याच्या हेतूने निरनिराळे कार्यक्रमही घेण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या (थर्ड पार्टी) पथकामार्फत संपूर्ण शहराची पाहणीही झाली होती. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात पुणे शहराने स्वच्छतेची गुणवत्ता वाढविल्याचे दिसून आले आहे. 

सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी आणि प्रचंड खर्च करूनही गेल्या वर्षी स्वच्छ स्पर्धेत पुणे शहराची घसरण झाली होती. तेव्हा पुण्याचा देश पातळीवर ३७ आणि राज्यात ८ वा क्रमांक आला होता. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका झाली होती. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सल्लागार नेमूनही स्पर्धेत पिछेहाट झाल्याने महापालिकेवर नामुष्की ओढविली होती. त्यावेळी सादरीकरणात कमी पडल्याची कबुली देत तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कामगिरी सुधारण्याचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमीवर मागील चुका दुरुस्त करीत यंदा यश मिळविल्याचे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. 

देशातील पहिल्या पाच शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश होईल, यादृष्टीनेच तयारी केली होती. परंतु, ज्या घटकांत कमी पडलो आहोत, त्यात सुधारणा करून नव्याने तयारी केली जाईल. पुणेकरांच्या सहकार्यातून स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी प्रयत्न करू. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगभरात Appleची सेवा ठप्प, iPhone यूजर्सना अडचणी; iCloud, App Storeसह अनेक सेवांवर परिणाम

Solapur Crime : सोलापुरात गोळीबाराने खळबळ! शिवा संघटनेचे अध्यक्ष भिंगे यांची घराजवळच गोळ्या झाडून हत्या, रात्री दहाच्या सुमारास काय घडलं?

Akvan Cyclone Update : पश्चिम बंगालच्या उपसागरातील 'अक्वान' चक्रीवादळाचा महाराष्ट्रात पावसाचा इशारा, किती दिवस राहणार वादळाची स्थिती

Latest Marathi News Live Update : दहा राज्यांत पावसाचा जोर वाढणार; काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Ratnagiri ACB Raid : परदेशी जहाजाला परवानगी देण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच; बंदर अधिकाऱ्यासह साथीदार जाळ्यात, 60 हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT