Pune_Collector 
पुणे

'चल सर्जा, चल राजा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीत हाकली बैलगाडी

मिलिंद संगई

बारामती (पुणे) : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती तालुक्यातील मेडद येथे जेसीबीसह बैलगाडी चालविण्याचा आनंद घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.१४) बारामतीत महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देशमुख बारामतीत आले होते. त्यानंतर तालुक्यातील मेडद येथे पाणंद रस्त्याचे काम त्यांनी जेसीबी चालवत सुरू केले. मेडद गाव ते कऱ्हा नदीच्या पूलापर्यंतचे दीड कि.मी. लांबीचे हे काम आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेही या प्रसंगी उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या बैलगाडीचा कासरा हातात धरत बैलगाडीही हाकली. जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीत येऊन जेसीबी आणि बैलगाडी चालविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला होता.

बारामती तालुक्यामध्ये एकूण 133 रस्ते पाणंद म्हणून प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आणि तहसिलदार विजय पाटील यांनी दिली. या पैकी 14 कि.मी. लांबीची 13 कामे पूर्ण झाली आहेत. ही जवळपास सर्वच कामे लोकसहभागातून येत्या मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन कांबळे आणि पाटील यांनी बोलून दाखविले. 

रविवारी मेडद येथील रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाणंद रस्त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल, त्यामुळे हे रस्ते वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

OMG! सनी लियोनीचं घर पाहिलत का? लक्झरी पॅलेस पाहून फराह खान झाली शॉक, करोडों खर्च करून बनवलेलं आलिशान घर

IPL 2026 Marathi News: अरे, रोहित मी तुला ओळखलंच नाही... नीता अंबानी 'हिटमॅन'ला पाहून असं का म्हणाल्या? Video Viral

Indian Railway: एक्स्प्रेसमध्ये वंदे भारतसारख्या सुविधा मिळणार, रेल्वेत थांब्यांबाबत घोषणा होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

झी मराठी- स्टार प्रवाहमध्ये टक्कर; 'तारिणी'ने झेंडा रोवला पण सायली कमळीला पुढे जाऊ देईना, टीआरपी टॉपर कोण?

SCROLL FOR NEXT