pune rescourse sakal
पुणे

पुणे : निर्बंध शिथिल तरीही रेसकोर्स बंद; नागरिक नाराज

रेसकोर्स पुण्यातील सर्वात मोठे मैदान आहे

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : केंद्र सरकार (central government) व राज्य सरकारच्या (state government) आदेशानुसार अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक सुरू करण्यात आले आहे तरीही रेसकोर्स बंद आहे. यामुळे येथे नियमित येणारे नागरिक नाराज आहे. रेसकोर्सवर अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने नागरिक सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी किंवा व्यायामासाठी येत असतात. तसेच प्रशिक्षित व इतर खेळाडू या मैदानाचा सरावासाठी उपयोग करतात. लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊनही रेसकोर्स बंद असल्याने खेळाडू व फिटनेसप्रेमी नाराज आहेत. (pune corona Restrictions relaxed but racecourse closed)

रेसकोर्स पुण्यातील सर्वात मोठे मैदान आहे. हे मैदान साधारण ११८ एकर जागेवर विस्तारलेले आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात दोन किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, व्यायाम, योग करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. लॉकडाऊन पूर्वी पहाटे पाच ते सकाळी साडे आठ आणि संध्याकाळी साडे चार ते संध्याकाळी साडे सात पर्यंत रेसकोर्स सर्वांसाठी खुले असायचे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये काही महिने बंद राहिल्यानंतर एक किंवा दोन महिने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केले होते. दुसरी लाट आल्यावर पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना रेसकोर्सवर प्रवेश बंद करण्यात आला. सध्या दुसऱ्या लाटेनंतर सर्व नियम शिथिल होऊनही रेसकोर्स बंद असल्याने ते पुन्हा सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

'केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार संपूर्ण राज्यात जॉगिंग ट्रॅक खुले झाले आहेत. पुण्यात ही जवळपास सर्व मैदाने व क्रीडांगण खुले झाले आहेत. रेसकोर्स पुन्हा सुरू करावे यासाठी साऊथ कमांडच्या पुणे सब एरिया ऑफिसरला याबाबत पत्र दिले असून लवकरच रेसकोर्स सुरू होईल,' असे स्थानिक नागरिक आणि क्रीडा प्रशिक्षक प्रदीप परदेशी यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Winter Session : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी आंदोलन; आक्रमक विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

‘3 इडियट्स 2’ येणार? रॅंचो–राजू–फरहान पुन्हा म्हणणार ‘ऑल इज वेल’

Leopard Issue : बिबट प्रश्नी पाच दिवसांत उपाययोजना; नाईक, बावनकुळे यांची विधानसभेत ग्वाही

Dakkhan Bull Story : हवं तर माझा जीव घ्‍या... पण ‘दख्खन’ द्या..! बैलमालकाच्या मायमाउलीचा टाहो; सांगलीतील मैदानातून हरवल्‍याने आर्त हाक

Kolhapur Pune Accident : पुणे नवले पुलासारखा अपघात कोल्हापुरात; सायबर चौकात ५ वाहनांची भीषण धडक, नियंत्रणासाठी उपाययोजना होणार का?

SCROLL FOR NEXT