पुणे

Pune Corona Update: दिवसभरात आढळले कमी रुग्ण; एक बळी म्युकरमायकॉसिसने

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरात आज नव्याने १ हजार ९३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५२ हजार ६४ इतकी झाली आहे. कालच्या पेक्षा आज कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ५१३ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २७ हजार १४ रुग्णांपैकी १,३९५ रुग्ण गंभीर तर ६,५०७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात १३ हजार ९८१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख १३ हजार ५६४ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ५६७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख १७ हजार ५३७ झाली आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले असून उद्यापासून आपल्याकडे या वयोगटासाठी लसीकरण होणार नाही. पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी

म्युकरमायकॉसीसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू

म्युकरमायकॉसीस या बुरशीजन्य आजारामुळे शहरात ४४ वर्ष वयाच्या पुरूषाचा मृत्यू झाला आहे. कोरोनानतर रोगप्रतिकार शक्ती अत्यन्त कमी झालेल्या आणि सहव्याधी (कोमॉर्बेडीटी) असलेल्या निवडक रूग्णांमध्ये हा आजार दिसू शकतो. गेल्या काही दिवसांत अशा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT