Corona Patient 
पुणे

पुण्यात कोरोनाबाधितांना मिळेना बेड; नातेवाइकांची होतेय दमछाक

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘काकांना कोरोना झाला. त्यांचे वय ६८ वर्षे. वीस वर्षे जुना मधुमेह आणि त्यानंतर झालेला उच्च रक्तदाबाचा विकार. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करताना नाकी नऊ आले. कोणतेच खासगी रुग्णालय दाखल करून घेईना. सगळीकडे जागा नसल्याचे सांगण्यात आले. अखेर ससून रुग्णालयाचा रस्ता धरला,’’ अनिल शास्त्री यांनी या संतप्त भावना ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाइकांची पुन्हा दमछाक होऊ लागली आहे. अखेर ससून रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. ‘‘शहरातील पाच वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांशी संपर्क साधला. रुग्णाला सहव्याधी असल्याचे सांगितले. पण, नाव नोंदवून घेण्यापलीकडे रुग्णालयाने कोणताही हालचाल केली नाही. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या पुढे २७ नंबर असल्याचे उत्तर एका खासगी रुग्णालयातून देण्यात आले. ४२ तास प्रयत्न केल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा नाद सोडला आणि काकांना ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी गाडीत बसवले,’’ असेही त्यांनी सांगितले.

शहरातील ८५ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही स्पष्ट लक्षणे नाहीत. मात्र, संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्याने त्यांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांना घरातच विलगिकरण होण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागते. तर, उर्वरित पाच टक्के रुग्णांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करणे आवश्यक असते. यासाठी रुग्णालयांमधून पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध करण्यात आल्याचा दावा, महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला. मात्र, शहरातील डॉक्टरांनी बेड मिळत नसल्याची माहिती ‘सकाळ’ला दिली. एकेका रुग्णाला बेड उपलब्ध करून देताना किमान दहा ते वीस फोन करावे लागतात, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेचे आकडे सांगतात...
८७८ - सरकारी रुग्णालयांत कोरोनासाठी राखीव ठेवलेल्या खाटा
२९६२ - खासगी रुग्णालयांतील राखीव खाटांची संख्या

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी गोळ्या झाडल्या, नंतर कोयत्यानं डोक्यात वार; गणेश काळेच्या हत्याकांडाचा CCTV VIDEO VIRAL

Wrestler Sikandar Sheikh : सिकंदर शेखची पैसा-प्रसिद्धीमुळे कुस्तीशी गद्दारी, वस्तादांसह पैलवान काय म्हणाले...

Maharashtra Protest : महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा वज्रनिर्धार, काळा दिनाच्या निषेध फेरीत हजारो मराठी भाषक सहभागी

Pune Weather Update : पुण्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नाही, नागरिकांना दिलासा

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT