water esakal
पुणे

पुणे : तेवीस गावात पाणीबाणी

गावे महापालिकेत आल्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी महापालिकेवर टाकल्याने सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाने (PMRDA) २३ गावे महापालिकेत (Corporation) समाविष्ट होण्यापूर्वी बांधकाम परवानगी देताना बांधकाम व्यावसायिकाकडून सोसायट्यांना टँकर उपलब्ध द्यावे अशी अट टाकली होती. मात्र, आता ही गावे महापालिकेत आल्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी महापालिकेवर टाकल्याने सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महापालिकेला पाणी देणे शक्य नसल्याने पीएमआरडीच्या अटी प्रमाणेच बिल्डरांनीच पाणी द्यावे व न देणार्या बिल्डरांवर कारवाई करावी अशी मागणी पीएमआरडीकडे केल्याचे समोर आले आहे.

राज्यसरकारने हद्दीलगतची तेवीस गावे महापालिकेत समाविष्ट केली. त्यामुळे या भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरा यासह इतर पायाभूत सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. तेवीस गावांमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा अद्याप अस्तित्वात नाही.

त्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान तेवीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली असून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून काही भागात पाणीपुरवठा केला जातो, तर ज्या भागात ग्रामपंचायतींचे पाणी जाऊ शकत नाही तेथे संबंधित बिल्डरने पीएमआरडीएचे पाणी उपलब्ध होईपर्यंत नागरिकांना पाणी द्यावे अशी अट बांधकाम परवानगी देताना घालण्यात आली होती. त्यानुसार पाणी पुरवठा केला जात होता.

ही गावे महापालिकेत आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी सोसायट्यांना पाणी पुरविणे बंद केले व आता महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे तेथील रहिवाश्यांना सांगण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांनी महापालिकेकडे टँकर पाठविण्यासाठी तगादा लावला आहे, त्यास महापालिकेने नकार दिला आहे.

महापालिकेने यासंदर्भात पीएमआरडीला आॅगस्ट महिन्यात पत्र पाठवले होते, त्यानंतरही स्थिती सुधारलेली नाही. तसेच २३ गावातील बांधकाम परवानगी देणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार शासनाने पीएमआरडीकडे दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने पीएमआरडीला हे पत्र पाठवले आहे. "

पीएमआरडीने त्यांची पाणी पुरवठा व्यवस्था होत नाही तो पर्यंत संबंधित बिल्डरने नागरिकांना पाणी द्यावे अशी अट घातली होती, त्यानुसार २३ गावात महापालिकेची पाणी वितरण व्यवस्था निर्माण होत नाही. तो पर्यंत बांधकाम व्यवासायिकांनी अटीनुसार या भागात पाणी देणे आवश्‍यक आहे. या अटींचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT