Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Corporation : अखेर 'त्या' ठेकेदारांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये मध्यवर्ती पेठांमध्ये सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अखेर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ठेकेदारावर कारवाईचा बडगा उचलला आहे. योग्य पद्धतीने खड्डे न बुजविल्याने २५ हजार रुपयांचा दंड केला आहे. महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये मध्यवर्ती पेठांमध्ये सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले. लॉकडाऊन संपून बाजारपेठ पूर्वपदावर आली तरी या ठिकाणचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले तेथे काही ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते बुजविले तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकले आहे.

शहरात समान पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ, बुधवार पेठ यासह इतर भागात रस्ते खोदण्यात आले. याठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकून रस्ते दुरुस्त केले. पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, चेंबर बर आले आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिका प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून टीका होत आहे. ‘सकाळ’नेही या खड्ड्यांची समस्या वारंवार मांडली.

यापार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा नुकताच पाहणी दौरा घडवून आणला. या भागातील रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना खड्डे व्यवस्थित बुजविले नसल्याचे आयुक्तांना निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रस्ते दुरुस्त करा असे आदेश पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ‘एल अँड टी’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

पेठांमधील रस्ते व्यवस्थित बुजविले नसल्याने ठेकेदारास २५ हजार रुपयांचा दंड केला आहे. ही रक्कम बिलातून वजा केली जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT