पुणे : पुणे महापालिकेत भाजपच्या कार्यकाळात समान पाणी पुरवठा, जायका प्रकल्प, समाविष्ट गावातील सांडपाणी व्यवस्था, ॲमेनिटी स्पेस भाड्याने देणे यासह इतर विषयांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी करावी यासाठी आज (ता. १७) राष्ट्रवादी काँग्रेसने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. (Pune Municipal Corporation Corruption)
समान पाणीपुरवठा योजना, बाणेर व वारजे येथे एक हजार कोटी रुपये कर्ज घेऊन हॉस्पिटल उभे करणे, महापालिकेच्या ३५० अँमिनिटी स्पेसच्या जागा भाड्याने देणे, 'जायका' या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेत आर्थिक अनियमितता, खासगी बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेची आरक्षीत जागा शाळेसाठी देणे, समाविष्ट ११ गावांमध्ये सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या ३९३ कोटीचे निविदेतही भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे राष्ट्र्वादीने केली आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, नगरसेवक सुभाष जगताप, बाबूराव चांदेरे, प्रदीप देशमुख, महेश हांडे उपस्थित होते.
यावर सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या इतिहासात जी कामे कधीच झाली नाहीत अशी कामे आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला हे राष्ट्रवादीने मान्य केल्याचे या आरोपातून स्पष्ट होते. तसेच ज्या विषयांच्या निविदा अंतिम झालेल्या नाहीत त्यात कसा भ्रष्टाचार होऊ शकतो. तसेच यातील बहुतांश प्रस्तावासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.