scholarships sakal
पुणे

महापालिकेचे संकेतस्थळ हँग; शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडथळे

पुणे महापालिकेतर्फे इयत्ता १०वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेतर्फे (Pune Corporation) इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ (Website) वारंवार हँग होत आहे. पालक व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज (Scholarship Application) भरण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिष्यवृत्ती भरण्याची मुदत १५ दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये समाज विकास विभागातर्फे महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाल्यास १५ हजार व बारावी एवढेच गुण मिळाल्यास २५ हजार रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळांमधील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ६५ टक्क्यांची आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवीच्या प्रवेश प्रक्रिया लांबली आहे व आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी असलेल्या संकेतस्थळाचा तांत्रिक प्रश्‍न निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नव्हते. त्यामुळे २८ जानेवारी पर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे संकेतस्थळ वारंवार हँग होत आहे. कागदपत्र अपलोड होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाहीत. क्षेत्रीय कार्यालयाकडे चौकशी केली तरी समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. आज (ता. २८) या योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. पण अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आल्याने आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडथळे येत असल्याचा तक्रारी आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत १२ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

तर कंपनीला नोटीस

एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून संकेतस्थळाबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. या संकेतस्थळाचे काम पाहणाऱ्या कंपनीला हा प्रश्‍न सोडविता न आल्याने विद्यार्थी, पालक व प्रशासनाला देखील अडचणी येत आहेत. याकंपनीला महापालिका एक लाख रुपये शुल्क देत आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यातील अडथळे दूर केले नाहीत तर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असे संगणक विभागाचे सहाय्यक आयुक्त राहुल जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT