Pune corporators will not get petrol right now in Pune Without Valid Reason 
पुणे

Lockdown : पुण्यात आता नगरसेवकांनाही मिळणार नाही पेट्रोल

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात 'लॉकडाऊन' असूनही नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी गल्लीबोळात वाहनांवरून फिरत असल्याची बाब पुणे पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. ही मंडळी लोकांच्या मदतीला धाऊन जात असली तरी, गर्दी होत असल्याने नगरसेवकांना इंधन न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. परंतु, कामाचे स्वरूप आणि त्याचा परिणाम स्पष्टपणे सांगितल्यास नगरसेवकांना पेट्रोल मिळेल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी स्पष्ट केले.

Coronavirus : बारामतीवरही घोंगावू लागलंय कोरोनाचे संकट!
नगरसेवकांना पेट्रोल पंपांवर प्रवेश देऊन, त्यांना पेट्रोल देण्याबाबत पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याशी चर्चा झाली आहे. सरसकट नगरसेवकांना पेट्रोल देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण कामानुसार ते दिलेही जात आहे. पुढच्या काळात गरज लक्षात घेऊन नगरसेवकांना पास पुरविण्याचा विचार होऊ शकतो. त्याबाबत पोलिसांशी पुन्हा चर्चा केली जाईल, हेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खराडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांना रविवारी पेट्रोल पंपावर जाण्यापासून पेट्रोल देण्यासही पोलिसांनी नकार दिला. 'प्रभागातील लोकांच्या मदतीला जावे लागते आहे, त्यामुळे पेट्रोल देण्याची विनंती जाधव यांनी केली. त्यानंतरही पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे नगरसेवक जाधव यांनी पेट्रोल न भरतातच आपली दुचाकी मागे घेतली. या पार्श्वभूमीवर नगरसेवक आपापल्या प्रभागांतील लोकांना काही प्रमाणात अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. त्यामुळे पेट्रोल देण्याचा नगरसेवकांचा आग्रह आहे. मात्र, सरसकट नगरसेवकांना पेट्रोल देता येणार नाही, असे पोलिसांनी महापालिका प्रशासनाला आधीच कळविले आहे. त्यावर गायकवाड यांनीही आपली बाजू मांडली.


गायकवाड म्हणाले, "नगरसेवक प्रभागातील लोकांना मदत करीत आहेत. पण तिथे गर्दीही होत आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल देता येणार नाही, हेही पोलिसांनी कळविले आहे. त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा योग्य नाही. मात्र काही कामांसाठी निश्चितपणाने नगरसेवकांना पेट्रोल मिळाले पाहिजे. तसे काम सांगितल्यानंतर पोलिसही अडविणार नाहीत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT