Bhaskar Jadhav Sakal
पुणे

Pune News: भास्कर जाधवांना कोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना पुण्याच्या सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. कोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. डेक्कन पोलीस स्टेशन इथं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. (Pune Court relief to Bhaskar Jadhav Granted anticipatory bail)

कुडाळ इथं आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाईचा दाखला देताना भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात सडकून टीका केली होती.

पुण्यात झाला होता गुन्हा दाखल

पुणे कोर्टात भास्कर जाधव यांची बाजू मांडताना अॅड. ठोंबरे यांनी कोर्टाला सांगितलं की, भास्कर जाधवांनी राणे कुटुंबियाविरुद्ध वैयक्तिक टीका केली आहे. कोणत्या समाज, जात, धर्माविरुद्ध टीका केलेली नाही. त्यामुळं भास्कर जाधवांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटी कलमे लाऊन राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्या वकिलांचा हा युक्तीवाद मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी अटी व शर्तींवर भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

SCROLL FOR NEXT