election  esakal
पुणे

Pune: 'न्यायालयाचा निकाल 9 मे पुर्वी आला तर ऑक्‍टोबरमध्ये महापालिका निवडणुकीची शक्‍यता'

त्यामुळे याबाबतचा निकाल आणखी काही दिवस पुढे ढकलला आहे. दरम्यान, सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 9 मे नंतर न्यायालय उन्हाळी सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे 9 मे पुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणुक होण्याची शक्‍यता आहे.'' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा सुतोवाच केले.

पुणे महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका मागील एक ते दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. संबंधित प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही.

त्यामुळे याबाबतचा निकाल आणखी काही दिवस पुढे ढकलला आहे. दरम्यान, सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले.

पाटील म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. मात्र हा सर्व न्यायालयाशी संबंधित विषय असल्यामुळे त्याबाबत काही बोलता येणार नाही.

परंतु मे महिन्यात न्यायालय उन्हाळी सुट्टीवर असते. 9 मे नंतर न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी लागेल. त्यामुळे त्यापुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणुका लागू शकतात. कारण जुनपासून पावसाळा सुरु होतो.

तसेच दरम्यान, मतदारसंघांच्या रचना, मतदार याद्या अद्ययावत करणे अशी निवडणुकीच्या तयारीची कामे सुरु होतात. त्यामध्ये बराच कालावधी जातो. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात, असा माझा प्राथमिक अंदाज आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

OMG! सनी लियोनीचं घर पाहिलत का? लक्झरी पॅलेस पाहून फराह खान झाली शॉक, करोडों खर्च करून बनवलेलं आलिशान घर

SCROLL FOR NEXT