Pune News sakal
पुणे

Pune : पाण्याच्या नियोजनाचा होणारा सावळा गोंधळ झाकण्यासाठी; अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन

बंधारे न भरल्याने स्वामी चिंचोली येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाबाबत रोष व्यक्त करून राजकीय नेत्यांकडे तक्रारी केल्या. पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील पाटबंधारे विभागाकडून सध्या सुरू असलेल्या खडकवासला कालव्याच्या पाण्याच्या आवर्तनातून वितरिका ३५ द्वारे स्वामी चिंचोली येथील ओढयावरील बंधारे भरून घेणे शक्य असताना केवळ अधिकारी व कर्मचार्यांच्या ढिसाळ नियोजन, ग्रामस्थांची मागणी व राजकीय दबावामुळे बाजूच्या शेतकर्यांना पूर्वसुचना न देता १५ किलो मिटर अंतरावर मळद येथे वितरिका ३२ जेसीबच्या साहाय्याने फोडून ओढयाद्वारे पाणी बंधार्यांमध्ये सोडण्याची नामुष्की ओढवली आहे.

पाण्याच्या नियोजनाचा होणारा सावळा गोंधळ झाकण्यासाठी मनमनीपणे वितरिका फोडून पाण्याचा अपव्यय केला आहे. या ढिसाळ कारभाराची चौकशी करून कारवाईची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.

स्वामी चिंचोली येथील ओढयावरील बंधारे खडकवासला कालव्याच्या वितरिका ३५ मधून पाणी सोडून नेहमी भरून घेतले जातात. माञ पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी चालू आवर्तनातून बंधारे भरण्याकडे निष्काळजीपणा करून वितरिकेचे पाणी बंद करण्यात आले.

बंधारे न भरल्याने स्वामी चिंचोली येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाबाबत रोष व्यक्त करून राजकीय नेत्यांकडे तक्रारी केल्या. पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिला.

त्यामुळे पाटबंधारे विभागाने नियोजनातील सावळा गोंधळ झाकण्यासाठी बुधवारी ( ता.३१ ) स्वामी चिंचोली येथील बंधार्यांपासून १५ किलो मिटर अंतरावर पाण्याचे आवर्तन चालू असलेल्या वितरिका ३२ जेसीबीच्या साहाय्याने फोडून पाणी ओढयाला सोडून बंधारे भरण्यास पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे पाण्याचा मोठयाप्रमाणात अपव्यय झाला आहे. वितरिका फोडण्याची कल्पना बाजूच्या शेतकर्यांना न दिल्याने अचानक आलेल्या पाण्यामुळे बाजूच्या शेतकर्यांनी साठवलेले शेणखत वाहून गेले.

काहींच्या शेताचे बांध फुटल्याने माती वाहून नुकसान झाले. बाजूला बांधलेल्या शेळया पाण्यात बुडाल्या माञ सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. हा सगळा प्रकार केवळ पाण्याच्या आवर्तनाचे ढिसाळ नियोजन व मनमानीपणा कारणीभूत आहे.

पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत ग्रामस्थ व शेतकर्यांशी चर्चा करून वितरणाचे नियोजन झाले असतेतर वितरिका फोडून पाणी सोडण्याची नामुष्की पाटबंधारे विभागावर आली नसती अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्या.

या प्रकारची चौकशी करून बांध फुटलेल्या शेतकर्यांची दुरूस्ती करून देण्याची मागणी होत आहे. याबाबत पाटबंधारे अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT