pune covid positive patients 325 today news 
पुणे

पुण्यामध्ये दिवसभरात एक हजार ३५२ रूग्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा बुधवारी ओलांडला. त्यापैकी ५४ टक्के (एक हजार ३५२) रुग्ण एकट्या पुणे शहरातील आहेत. शहरात फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांचे प्रमाण पुन्हा वाढण्यास सुरवात झाली. पुण्यात ३० सप्टेंबरला एक हजार ३३६ रुग्ण होते. त्यानंतर सहा महिन्यांनी पुण्यात कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा एक हजार ३५२ पर्यंत वाढला. त्यामुळे आता ही दुसरी लाट आहे का, अशी चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली.

सध्या दिसणारी वाढ ही अचानक काही दिवसांपुरती आहे की, दुसऱ्या लाटेची सुरवात आहे, हे पुढील काही दिवसांमध्ये कळेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी दिली. ही दुसरी लाट असेल, असे गृहित धरले तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत आपली आरोग्य यंत्रणा आता खूप सुसज्ज आहे, असा विश्वास साथरोग तज्ज्ञांनी व्यक्त केला.

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी; तब्बल १८ हजार जणांना सातवा वेतन आयोग लागू

आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्याची व्याप्ती अजून वाढवायची आहे. कोरोनाचा संसर्ग झाला तरीही लसीकरणामुळे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण खूप कमी होईल. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने मृतांचे प्रमाण सध्या आपल्याला कमी झालेले दिसते. त्याच वेळी पुरेशा ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर्स उपलब्ध असल्याने गेल्या वर्षीसारखी वेळ पुन्हा येणार नाही, असाही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

दृष्टीक्षेपात कोरोना उद्रेक

आजची संख्या
तपासलेले नमुने ................ ७७२१
कोरोनाबाधीत रुग्ण .......... १३५२
अत्यवस्थ रुग्ण ............... ३६४
ऑक्सिजन असलेले रुग्ण .... ७२१
मृत्यू ................................. ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT