Crime Esakal
पुणे

Pune Crime : 11 गुन्हे, आठ महिन्यापासून फरार, अखेर जेरबंद

वाहन चोरीचे चार गुन्हे व वाहनातील बॅटरी चोरीचे सात गुन्हे असे एकूण 11 गुन्हे केले असल्याची कबुली दिली

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - 27 –चोरीचे 11 गुन्हे दाखल असलेला व आठ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.ओंकार राजेश मोरे ( वय 19, रा. स. न.14, रामनगर, येरवडा, पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट सहाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना रमेश मेमाणे व ऋषीकेश ताकवणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारा व वाहनातून बॅटरी चोरी करणारा ओंकार चोखीधानी रोड येथे थांबलेला आहे. तेथे जाऊन युनिट सहाने त्याला ताब्यात घेतले.

त्याने त्याचा साथिदार शुभम जांभूळकर याच्या मदतीने वाहन चोरीचे चार गुन्हे व वाहनातील बॅटरी चोरीचे सात गुन्हे असे एकूण 11 गुन्हे केले असल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, प्रमोद मोहिते, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Cafe Illegal : कॅफेत स्पेशल रूम, तिथेच बाथरूम अन् ३५० रेट; इचलकरंजीत अश्लील धिंगाणा, कंडोमची पाकिटेही सापडली...

मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजप आमदाराची मागायला लावली माफी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

Year End 2025: करा 'या' 5 हेल्थ टेस्ट, आजार ओळखणे होईल सोपे

IND vs SA, 3rd ODI: अखेर दोन वर्षांनी भारतीय संघाने जिंकला टॉस! निर्णायक सामन्यासाठी Playing XI मध्ये काय झालेत बदल?

SCROLL FOR NEXT