Pune Crime esakal
पुणे

Pune Crime: पुणे पोलिसांची दमदार कामगिरी! विमानाचे इंधन चोरणारी टोळी गजाआड

२ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

रुपेश नामदास

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होते आहे. अशातच आता लोणीकाळभोर परिसरात पेट्रोलचोरीची घटना उघडकीस आली आहे. एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून विमानाला लागणाऱ्या पेट्रोलची चोरी करताना एका टोळीला रंगेहात पकडण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरट्यांकडून एकून २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शिर्डी विमानतळाकडे इंधन घेवून जात असलेल्या टँकरमधून ही चोरी करण्यात येत होती.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे

सुनिलकुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कवलु सरोज, सुनिल रामदास तांबे

दरम्यान हडपसर भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांचे पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला इंधन चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली. नवी मुंबईतील वाशी येथून एटीफ पेट्रोल-डिझेल भरून टँकर शिर्डी विमानतळाकडे निघाले होते.

इंधन कंपनीकडून टँकरच्या प्रवासाचा मार्ग ठरवण्यात आला. या सोबतच टँकरचा माग घेण्यासातीह विशिष्ट यंत्रणा त्यात बसवण्यात आली होती. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना टँकर मधील इंधनाची चोरी होत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी हडपसर परिसरात छापा टाकला. या छाप्यात टँकरमधून इंधनाची चोरी होत असल्याचे दिसले. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT