पुणे

Pune Crime: पालखीचा नगारा अडवणे गावकऱ्यांच्या आले अंगलट

Tarukram Maharaj Palkhi : सरपंचासह वीस ते पंचवीस ग्रामस्थांवर गुन्हा दाखल , पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार भिसे यांनी फिर्याद दिली.

सुवर्णा कांचन

Uruli kanchan: जगद्गुरू संत‌ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील नगारा अडवणे उरुळी कांचन गावकऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. नगारा अडवून पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी संरपंचासह १५ ते २० पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमित कांचन (सरपंच), भाउसाहेब कांचन (माजी सरपंच), अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पू कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन व इतर १५ ते २० पदाधिकारी व ग्रामस्थ, (सर्व राहणार उरूळी कांचन ता. हवेली जि. पुणे) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार भिसे यांनी फिर्याद दिली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर रस्त्यावरून बारामती मार्गे पंढरपूरकडे जात आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी उरुळी कांचन गावात प्रवेश केला. वर्षानुवर्षं चालू असणाऱ्या परंपरेप्रमाणे पालखी सोहळा आश्रम रोड मार्गे तळवाडी चौकातून गावाला प्रदक्षिणा घालून पुढे यवत ला मार्गस्थ होतो. तसेच उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रागंणात दोन तासाच्या विसाव्यासाठी थांबतो.

पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दोन तासाच्या विसाव्यासाठी येणार असल्याने महात्मा गांधी विद्यालयातील प्रागंणात वारकऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आला होता. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रागंणात हिरकणी कक्ष, महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधान गृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

मात्र, यावर्षी संत तुकाराम महाराज सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सोहळ्याचा मार्ग बदलला. सोहळ्याच्या प्रवासाचा तपशील पूर्वीच जाहीर केला होता. त्यामध्ये उरुळी कांचन गावातील विसावा रद्द करून, तो उरुळी कांचन फाट्यावर होईल असा उल्लेख केला होता. मात्र, सोहळा प्रमुख व विश्वस्तांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गावातील नेते मंडळी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी येथील एलाईट चौकात पालखी सोहळ्याचा नगारा आडवत घोषणा बाजी केली.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी सरपंचासह वीस ते पंचवीस पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT