Crime Sakal
पुणे

Pune Crime : पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; भावाकडून बहिणीवर बलात्कार

ही धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, बहिणीवर भावाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

ही धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली असून, ओयो हॉटेलवर नेऊन बलात्कार करत अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, सिधलिंगप्पा मलाप्पा मादर (२९) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

हा संपूर्ण प्रकार सप्टेंबर २०२१ पासून सुरू होता. आरोपी सिधलिंगप्पा मलाप्पा मादर मूळचा कर्नाटकचा असून, तो वडगाव शेरी भागात वास्तव्यास होता.

मादर हा पीडतेचा आत्येभाऊ असून, सिधलिंगप्पाने अनेक वेळा पीडितेला लग्न न करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सिधलिंगप्पाने पीडितेला त्याच्या मूळ गावी कर्नाटकमध्ये नेऊन तसेच पुण्यातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने दिली आहे.

लग्न न करण्याची धमकी देत वारंवार शाररिक संबंध ठेवले, एवढे करून आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून व्हायरल केले.

त्यानंतर या संपूर्ण प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३७६, ३७६ (२), ५०६ सह आय टी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT