Crime News Extortion demanded directly from Tehsil Dar crime against two police solapur esakal
पुणे

Pune Crime : कोथरूडमधील व्यावसायिकाला १५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी

या धमकीमुळे व्यावसायिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधव या सराईत गुन्हेगाराच्या नावाने कोथरूडमधील एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी एका व्यावसायिकाने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खोदकामासाठी जेसीबी पुरविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. कोथरुडमधील घरी असताना त्यांना शनिवारी रात्री अनोळखी क्रमांकावरुन दूरध्वनी आला. ‘मी संतोष जाधव बोलत आहे. पंजाबमधील सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण माहीत आहे का? जीव वाचवायचा असेल तर १५ लाख रुपये खंडणी दे, अन्यथा गोळ्या घालीन’, अशी धमकी देण्यात आली.

या धमकीमुळे व्यावसायिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला. धमकीचा आलेल्या मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. पोखरी, ता. आंबेगाव) याच्यासह टोळीतील सहा जणांविरुद्ध जुलै महिन्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. जाधव सध्या कारागृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

आजचे पंचांग 7 ऑगस्ट 2026! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ७ ऑगस्ट २०२६

युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

SCROLL FOR NEXT