पुणे

Pune Crime: शेतजमीनीच्या वादामधुन चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन खुन, आरोपीला अटक !

पराग जगताप

Latest Pune News : वाटखळे ता.जुन्नर येथे शेतजमीनीच्या वहिवाटीच्या वादामधुन चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन खुन झाला असून खुन करणाऱ्यां दोन आरोपीना ओतूर पोलीसांनी अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली आहे.

निखील संदिप घोलप, वय २०, रा. वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे असे खुन झालेल्या तरूणाचे नाव असून या खूना बाबत अभिषेक प्रकाश घोलप वय.२३ व जितेंद्र पांडुरंग घोलप वय.३१, दोन्ही रा. वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे या आरोपीना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तीन ऑगस्ट रोजी मुलगा निखील संदिप घोलप हा एक ऑगस्ट पासून वाटखळे येथून हरवला असल्याची तक्रार त्याचे वडिल संदिप खंडु घोलप यांनी ओतूर पोलीसात दिली.सदर मिसींगचा तपास पोलीस हवालदार भारती आनंदा भवारी व पोलीस नाईक नदीम तडवी हे करीत होते.

निखील च्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स प्राप्त करण्यात आले. पोलीस हवालदार महेश पटारे यांनी प्राप्त कॉल डिटेल्यचे तांत्रिक विष्लेशन केले.त्यानुसार एक ऑगस्ट रोजी निखील घोलप व त्याचे नातेवाईक चुलत चुलते अभिषेक प्रकाश घोलप व जितेंद्र पांडुरंग घोलप यांचेत वेळोवेळी कॉल झाल्याचे तसेच निखील चा मोबाईल बंद झाला त्यावेळी तीघांचे लोकेशन एकाच परिसरात असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार अभिषेक घोलप व जितेंद्र घोलप यांचेकडे चौकशी केली असता पोलीस खाक्या दाखवल्यावर त्यांनी कबूल केले की सुमारे ३ वर्षापासुन शेतजमिन वहीवाटीचे कारणावरून त्यांचे बरोबर भांडणे असुन सुमारे ५ महीन्यांपासुन त्यांचा मुलगा निखील घोलप हा सुद्धा त्याचे वडील संदिप घोलप यांचे प्रमाणेच शेतजमिन वहीवाटीचे कारणावरून आम्हाला तसेच आमचे कुटुंबातील सर्वांना शिवीगाळ दमदाटी करून वारंवार त्रास देत असल्याने त्याचे त्रासाला कंटाळुन आम्ही दोघांनी त्याला खल्लास करायचे ठरवले.

त्याप्रमाणे एक ऑगस्ट रोजी निखील घोलप व आमचेत वेळोवेळी फोन कॉल झाले असुन निखील हा जुन्नर येथे असल्याचे समजल्याने आम्ही होंडा शाईन मोटार सायकल नं.एम.एच.१४.एच.एच.६५७८ वरून रात्री ९.०० वा. चे सुमारास जुन्नर जुने एस.टि. स्टँडचे जवळील नवीन कमान येथुन निखील घोलप याला मोटार सायकलवर बसवुन घेवुन जुन्नर-घोडेगाव -तळेघर मार्गे मौजे फळोदे, ता. आंबेगाव, जि.पुणे गावचे हद्दित गार मावलाया नावाचे डोंगर उतारावरील रोडवर घेवुन जावुन तेथे निखील याचे डोक्यावर व छातीवर दगडाने मारून खुन केला व त्याची बॉडी कोणाला दिसुन येवु नये म्हणुन उचलुन रोडचे खाली खोलवर खड्डयात टाकुन दिली. तसेच निखीलचा अॅन्ड्रॉइड मोबाईल जुन्नर येथील पाताळेश्वर महादेव मंदीराचे जवळील नदीचे पात्रात टाकुन घरी निघुन आलो अशी खूनाचा कबुली दिली.

आरोपीनी दिलेल्या माहितीनुसार मौजे फळोदे, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे घटनास्थळी खात्री करणेसाठी जात असता तेथील पोलीस पाटील विजु मेमाने यांना पोलीसांनी संपर्क करून घटनास्थळी बोलावले.१५ ऑगस्ट रोजी सदर घटनास्थळावरून एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत मिळुन आले असुन घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून रजिस्टरी नोंद झाली असल्याचे पोलीस पाटील मेमाने यानी माहिती दिली.

त्याप्रमाणे घोडेगाव पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता सदर पुरुष जातीचे प्रेताचे वर्णन, अंगावरील कपडे हे निखील संदिप घोलप याचे वर्णनाशी मिळते जुळते असल्याची खात्री पटली.त्यानुसार नदीम तडवी यांनी अभिषेक प्रकाश घोलप व जितेंद्र पांडुरंग घोलप यांचेविरूद्ध ता.१८ ऑगस्ट रोजी सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद नोंदवली असून दोन्ही आरोपीना अटक करून मा. जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याना ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक एल.जी थाटे करीत आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,पोलीस हवालदार महेश पटारे, दिनेश साबळे, ,नामदेव बांबळे,भारती भवारी,विलास कोंढावळे,शंकर कोबल,पोलीस नाईक नदीम तडवी, ज्योतीराम पवार, रोहीत बोंबले, मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे,शामसुंदर जायभाई,संतोष भोसले, संदिप भोते, अतुल भेके,राजेंद्र आमले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor Death Case: हत्या की आत्महत्या? एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीचं मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

Share Market Closing : फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाआधी सेन्सेक्स 369 अंकांनी वधारला; तर निफ्टी निर्देशांक 26,000 वर, जाणून घ्या कोणत्या शेअर्सने दिले सर्वाधिक परतावे

Latest Marathi News Live Update : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयात दाखल

SBI Job Vacancy 2025: SBI जॉब अलर्ट! स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू, पॅकेज तब्बल 1.35 कोटी

बिग बॉस 19 साठी सलमानला मिळतं 150-200 कोटी मानधन ! निर्मात्याचा धक्कादायक खुलासा "आम्ही भांडतो पण.."

SCROLL FOR NEXT