Aurangabad Crime News
Aurangabad Crime News sakal
पुणे

Pune Crime : क्रूरतेचा कळस! 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील पाषाण परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे. या घटनेप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली

मात्र, पंकजने पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT