police sakal
पुणे

Pune Crime News: धामणीत जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून चाकुने धमकाऊन पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपयांची चोरी

चाकुन धाक दाखवून अंगावरील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे जाताना घराला बाहेरून कुलूप लाऊन तसेच घराची लाईट तोडून गेल्याने आज शुक्रवारी सकाळी सहा वाजता हि घटना उघडकीस आली.

सुदाम बिडकर

Pune Crime News: आंबेगाव येथील जाधवमळ्यात काल गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजाची कडी तोडून गोविंद भगवंत जाधव (वय ७७ वर्ष ) व नंदा गोविंद जाधव ( वय ७० वर्ष ) या जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून धक्काबुक्की करत,

चाकुन धाक दाखवून अंगावरील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे जाताना घराला बाहेरून कुलूप लाऊन तसेच घराची लाईट तोडून गेल्याने आज शुक्रवारी सकाळी सहा वाजता हि घटना उघडकीस आली.

येथील जाधवमळ्यात पोंदेवाडी रस्त्यावर गोविंद जाधव यांचे एकांटी घर आहे. जवळ दुसरे कोणतेच घर नाही गोविंद जाधव व त्यांची पत्नी नंदा हे दोघेच राहतात.

त्यांची मुले व नातवंडे बाहेरगावी असतात काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोघे तरुण लकी ड्रॉ चे कुपन विकण्याच्या बहाण्याने जाधव यांच्या घरी आले होते. कदाचित त्यांनी त्यावेळी घराची पाहणी केली असेल कि घरात दोघां शिवाय दुसरे कोणी नाही

जवळपास दुसरे घर हि नाही यांच्या अंगावर दागिनेही आहे. रात्री सुमारे साडेअकरा वाजता अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजाची कडी तोडून आत येऊन या जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून

चाकूचा धाक दाखवत धक्काबुक्की करत धमकाऊन गोविंद जाधव यांच्या हातातील एक दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दुसरी अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी तसेच नंदा गोविंद जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,

अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी व अर्धा तोळेचा कानातील दागिना, एक नथ तसेच घरातील रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.

चोरट्यांनी जाताना जाधव यांच्या मोबाईल मधील बॅटरी काढून घेतली, घराला बाहेरून कुलूप लाऊन घराच्या लाइटची वायर तोडून चोरटे पसार झाले. बाहेरून कुलुप लावल्याने या जेष्ठ दांम्पत्यास काही हि करता आले नाही.

रात्रभर ते मोठमोठ्याने ओरडुन आवाज देत होते परंतु जवळ दुसरे कोणतेच घर नसल्याने कोणालाही आवाज आला नाही

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही अंतरावर घर असलेले सुनील गुलाब जाधव यांना गोविंद जाधव यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला सुनील जाधव यांनी माजी सरपंच सागर जाधव,

वसंतराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव , माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा जाधव व कैलास जाधव यांना बोलावून घेतले तसेच पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यानंतर,

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे व पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंची युवासेना आक्रमक

SCROLL FOR NEXT