Crime esakal
पुणे

Pune Crime : तळजाई वसाहतीमध्ये दहशत माजविणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिसांनी तळजाई वसाहतीमध्ये दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार मयूर आरडे याच्यासह टोळीतील दहा साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

टोळीप्रमुख मयूर रंगनाथ आरडे (वय २२), हृषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३), रोहन राजू आरडे (वय २१), आदित्य पद्माकर डाकले (वय २०), आकाश मनोज डाकले (वय २३), अनिकेत रवींद्र शिंदे (वय २४), ऋषभ शंकर कांबळे (वय २३), जयेश दत्ता ढावरे (वय १९, सर्व रा. पद्मावती, तळजाई वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मयूर आरडे टोळीविरुद्ध गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत माजविणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सहकारनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी या टोळीवर मोका कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत पाठवला.

अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोका कारवाईस मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT