crime File Photo
पुणे

'सोन्या' म्हटल्याच्या रागातून बुलेट चालकासह 2 महिलांना मारहाण; हडपसरमधील घटना

दुचाकीचा आवाज वाढविल्याचा जाब विचारणाऱ्यास सोन्या म्हटल्याच्या रागातून सहा ते सात जणाच्या टोळक्‍याने तरुणास लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. त्याचबरोबर तरुणाची पत्नी आणि सासूलाही जबर मारहाण केली.

सकाळ डिजिटल टीम

पुणे- दुचाकीचा आवाज वाढविल्याचा जाब विचारणाऱ्यास सोन्या म्हटल्याच्या रागातून सहा ते सात जणाच्या टोळक्‍याने तरुणास लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. त्याचबरोबर तरुणाची पत्नी आणि सासूलाही जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील साडे सतरानळी परिसरात घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंदा काळे (वय 25, रा.साडेसतरा नळी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे हे गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बुलेटवरुन हडपसरमधील साडेसतरा नळी परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांनी बुलेटची रेस वाढविल्याने मोठा आवाज झाला. तेव्हा आरोपींपैकी एकाने फिर्यादीस "आवाज कोणाला काढला रे' असा जाब विचारला. त्यावेळी फिर्यादीने "ऐ सोन्या तुला नाही' असे उत्तर दिले. त्याचा राग आल्याने आरोपीने "मला सोन्या नाही म्हणायचे, मी इथला भाई आहे. यापुढे मला भाई म्हणायचे' अशी धमकी देत फिर्यादीस लाथाबुक्‍क्‍यांनी कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. हा प्रकार पाहून फिर्यादीची पत्नी व सासू भांडणे सोडविण्यासाठी आल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीची पत्नी आणि सासूलाही हाताने मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.बी.जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT