Pune Crime Esakal
पुणे

Pune Crime: पैसे परत न केल्यानं सावकाराने पतीपुढेच पत्नीवर केला बलात्कार, पुण्यातील खळबळजनक घटना

खासगी सावकाराने जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे खाजगी सावकाराने पतीसमोर पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सावकाराने पत्नीवर अत्याचार करताना तिच्या पतीला समोरच बसवून ठेवलं होतं. त्यानंतर आरोपी सावकाराने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.(Latest Pune News)

मिळालेल्या माहीतीनुसार पुण्यातील हडपसर भागामध्ये फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. पण ती 34 वर्षीय पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर आता ही घटना समोर आली आहे. तिच्या फिर्यादीनुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Pune News)

पीडित महिलेच्या पतीला आरोपी इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे महिलेचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवत आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.

त्यानंतर या संपूर्ण घटनेचा आरोपीने व्हिडिओ देखील बनवला होता. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी इम्तियाज हसीन शेख याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा प्रकार समजताच पीडितेने हडपसर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.(Latest Pune News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT